TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM : टॉप 50 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM : टॉप 50 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha
एनडीएने लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वीच बहुमताचा आकडा गाठलाय, एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा.
बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष शिगेला, वंजारी समाजबहुल २ गावांचा अजब ठराव, मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय.
बीड जिल्ह्यात मराठा वंजारी जातीय संघर्ष, मराठा समाजाच्या दुकानावर वंजारी समाजानं जायचं नाही, मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचं नाही, मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही. जो हे नियम मोडेल त्याला ५००० रूपये दंड ठोठवणार.
कोकण पदवीधरमधून मनसेची अभिजीत पानसेंना उमेदवारी, विधानपरिषद कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे रिंगणात.
कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार, त्याच जागेवर मनसेने उमेदवारी जाहीर केल्यानं आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित.