Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP Majha
राज्यातील आयटीआयमध्ये संविधान मंदिराची निर्मिती करणार, त्यात संविधानाच्या विचारांची शिकवण देणार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा.
एमसीएच्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये रत्नागिरीच्या पुरुष संघाचा सलग दुसऱ्यांदा विजय, गहुंजेतील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीने नाशिक संघाचा 24 धावांनी पराभव केला.
अहमदनगरच्या करंजी परिसरात नार्कोटिक्स विभागाची कारवाई, सव्वाशे किलो गांजासह ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन वाहनांमधून हा गांजा पुण्याला नेला जात होता.
अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन लहान मुलींचा मृत्यू, काळेगावातील घटना.
अलिबागच्या मुनवली तलावात दोन मुलं बुडाली, एकाचा मृतदेह शोधण्यात यश, एक जण बेपत्ता.
संत खंडोजी महाराज संस्थानाची दिंडी नंदुरबारहून मार्गस्थ, १९८ वर्षाची दिंडीची परंपरा, २५ दिवसात दिंडी पंढरपूरला पोहोचणार.
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल, याबाबत तपास करण्याचे केंद्र सरकाने सीबीआयला दिले होते आदेश.