Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष

Continues below advertisement

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना, आज ही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुये. मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही, तर एका ही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिलाय. पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे, परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळं इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या, या वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आलंय. त्यामुळं वारकरी, गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करतोय. याचअनुषंगाने आता इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिलाय. आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram