Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा आढावा : ABP Majha 01 August 2024
विधानसभेला मुंबईसाठी भाजपचे विशेष प्लॅनिंग, सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या ३६ विधनसभा मतदासंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून 'महिला वोट बँकेवर विशेष लक्ष, लाडकी बहीण योजना प्रचार प्रसाराठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवर मेळावे.
अनितीमान, असंस्कारी, कपाटी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस, खासदार संजय राऊतांची टीका.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता, फडणवीस यांची नुकतीच झाली होती पंतप्रधान मोदींशी भेट, फडणवीसांच्या नावाला संघाचा पाठिंबा असल्याची चर्चा.
एक तर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान, तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप
विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरलीसुरली गुर्मी उतरवतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच, ठाकरेंचं मोदींना आव्हान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते, फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतूक.'
उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिक शोभत नाही! महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले, ते जनतेसमोर येत आहे. प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर.
राहुल शेवाळे मानहानी खटल्यातला दंड भरण्याचे ठाकरे, राऊतांना आदेश, १० दिवसांत २००० रूपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश, मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी
ठोठावलाय दंड.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)