Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 ऑगस्ट 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 ऑगस्ट 2024: ABP Majha
दोन चिमुकल्यांना ओरबाडणाऱ्या बदलापूरमधल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी संपूर्ण राज्यभरातून केली जात आहे. आरोपीला फाशी द्या, अशीच मागणी करत अख्खं बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं. याप्रकरणाचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले होते. अशातच आता या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदेची तीन लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अक्षयच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्याचंही समोर आलं होतं. पण आता याप्रकरणी एक नवा ट्वीस्ट आलाय, एबीपी माझानं अक्षय शिंदेच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी आरोपीच्या आई-वडिलांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. बदलापूर (Badlapur Crime) प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील आणि लहान भावाशी कॉलद्वारे संपर्क साधला असता, या तिघांनी अक्षय निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात अक्षयला फसवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एवढंच नाहीतर, 17 तारखेच्या अटकेनंतर अक्षयला स्थानिकांकडून मारहाण झाल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबानं केला आहे.