Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 15 ऑगस्ट 2024: ABP Majha
स्वातंत्र्य दिनाच्या पूरवसंध्येला भंडारदरा धरण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजला,धरणाच्या दरवाजांना तिरंगा ध्वजाची रोषणाई,पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसर सज्ज.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नांदेड येथील विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प सजला तिरंगी रोषणाईने, नांदेडकरांनी केली रोषणाई बघण्यासाठी गर्दी.
स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई, दोन्ही इमारतींची ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधी समाजाच्या वतीने बीडमध्ये मशाल रॅलीचे आयोजन, यावेळी सिंधी समाजातील पुरुष महिला आणि चिमुकले मशाल रॅलीत सहभागी.
भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणावर तिरंग्याची लेजर विद्युत रोषणाई, आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची ग
विठ्ठल मंदिर, दर्शन मंडप, भक्त निवासाला तिरंगी रोषणाई. तिरंगी रंगात न्हावून निघालेलं विट्ठल मंदिर पाहाण्यासाठी भाविकांची गर्दी.
कोल्हापूरच्या कागलमधील पाझर तलावात म्युझिकल फाउंटनचा शोचं सादरीकरण, देशभक्तीपर गाण्यांचं सादरीकरण पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी.
स्वातंत्र्यदिना निमित्त तेरा ते चौदा हजार बटनाचा वापर करुन बनविला तिरंगा कुर्ता,सांगलीतील मिरजमधील इम्रान मलिदवाले या टेलरची कारागीरी.
लातूरच्या अहमदपूरमध्ये १ हजार १२१ फुट लांब ध्वज घेत तिरंगा रॅली, रॅलीत देण्यात आलेल्या देशभक्तींच्या घोषणांनी अहमदपूर शहर दुमदुमलं.
भिवंडीत आशा सेविकांची आरोग्य जनजागृती तिरंगा रॅली, शेकडो आशा सेविका रॅलीत सहभागी.






















