ST Workers Strike : एसटी संपाचा आज आठवा दिवस; आज तोडगा निघणार? ABP Majha
एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे... एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी ८ दिवसांपासून कामबंद आंदोलन करताहेत. मागील ८ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. भाजप आमदारल गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. त्यात काल परिवहनमंत्र्यांनी संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ असा शब्द दिलाय. तरी, संप अजूनही मागे घेतलेला नाही. त्यात आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांशी चर्चा होणार आहे. संपाबाबत आज १० वाजेपर्यंत निर्णय घेऊ, अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिलीय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
