एकाच कुटुंबातील सहा जणांचा धक्कादायक मृत्यू, जनरेटरच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
सारंग पांडे, एबीपी माझा
Updated at:
13 Jul 2021 11:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर भागात आज एका दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका नवविवाहित जोडप्याचाही समावेश आहे. रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.