Devendra Fadnavis Ladaki Bahin Yojana : सर्व भगिनींना विनंती,एजंटच्या नादी लागू नका,फडणवीसांचे आवाहन

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Ladaki Bahin Yojana, Mumbai : "लाडकी बहिण योजनेबाबत (Ladaki Bahin Yojana) सर्व भगिनींना विनंती करतो की, एजंटच्या नादी लागू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून काढून टाकलं, सस्पेंड केलं. त्याला बडतर्फ करण्याचा विचारही राज्य सरकार करत आहे. सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. यावर जर सेतू केंद्राने पैसे घेतले तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल. लाडकी बहिण योजना पारदर्शकपणे राबण्याचा आमचा हेतू आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते. 

माझी लाडकी बहिण  ही अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगल्या योजनांची घोषणा केली आहे. माझी लाडकी बहिण (Ladaki Bahin Yojana) ही अत्यंत महत्वकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. या योजनेमध्ये काल काही बदल करण्यात आले आहेत. 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये आहे. त्यांना 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram