एक्स्प्लोर

Sindhudurg Lockdown : सिंधुदुर्गात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पालकमंत्री उदय सामंतांची घोषणा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषित केला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, बेकरी, भाजीपाला, दूध व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी करायची मुभा देण्यात आली आहे. मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिनांक 9 मे रात्री 12 ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे.

या काळात सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने ( कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापी सदर दुकानांची घरपोच सेवा ( Home Delivery)  सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीतच चालू ठेवणेस परवाणगी राहील.

आंबा वाहतूकीस परवानगी राहील मात्र वाहतुकीदरम्यान कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. कृषि अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. लसीकरणाकरता प्रवास करणाऱ्या व्यक्तींना व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्यांना यामधऊन सूट देण्यात येत आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Zee Marathis Popular Serials: झी मराठीवरील 3 मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; 'सनई चौघडे', 'कमळी' अन् 'तारिणी'त रंगणार नवा थरार
झी मराठीवरील 3 मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; 'सनई चौघडे', 'कमळी' अन् 'तारिणी'त रंगणार नवा थरार
Shivsena : वरळीची शिवसेना दत्ता नलावडेंनी बांधलीय, सचिन अहिरच्या जाण्याने कसला धक्कातंत्र? ठाकरेंचा जुना शिवसैनिक कडाडला
वरळीची शिवसेना दत्ता नलावडेंनी बांधलीय, सचिन अहिरच्या जाण्याने कसला धक्कातंत्र? ठाकरेंचा जुना शिवसैनिक कडाडला
सावधान! बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र, 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
सावधान! बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र, 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Embed widget