Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेसाठी सहावी जागा शिवसेने लढणार : Sanjay Raut ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यातच सहावी जागा शिवसेनेचा लढवणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. सहाव्या जागेसाठी पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा राऊतांनी केलाय. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु झालीय. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधल्यास शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधी ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय. तसंच खासदारकीसाठी पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजेंनी सर्व आमदारांना पत्रही लिहिलंय. तिकडे भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे.