Vishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावे

Continues below advertisement

Vishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावे  गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लिमाना प्रवेश नकारावा... विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजन समित्यांकडून व्यक्त केली अपेक्षा...  नवरात्रात होणाऱ्या गरबा (दांडिया) आयोजनाबद्दल विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केलेल्या अपेक्षांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे... महाराष्ट्रात गरबा उत्सवात मुस्लिम आणि इतर बिगर हिंदू धर्मियांना मुळीच प्रवेश देऊ नये, त्यासाठी गरबा नृत्य होत असलेल्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांचे आधार कार्ड तपासावे असे विश्व हिंदू परिषदेने म्हंटले आहे...     ज्यांची श्रद्धा भगवती मातेवर नाही, जे देवीला मानत नाही त्यांनी गरबा उत्सवात येऊ नये असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे... नवरात्रात होणारा गरबा म्हणजे नृत्य नाही, सांस्कृतिक कार्यक्रम नाही, इव्हेंट नाही... गरबा भगवती मातेला प्रसन्न करण्याचा नृत्य आहे.. तो आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्याचा साधन आहे आणि ज्यांची श्रद्धाच देवी मातेवर नाही, त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश का करावा असा सवाल शेंडे यांनी विचारला आहे...  काही लोकं निश्चितच वेगळा मनसुबा घेऊन गरबा होत असलेल्या ठिकाणी प्रवेश करतात म्हणून आम्ही गरबा उत्सव मंडळांना सर्वांचे आधार कार्ड तपासावे, भाविक प्रवेशद्वाराच्या आत येताना प्रत्येकाला टिळा लावावा, प्रवेशद्वारावर देवी मातेची फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि त्याला नमस्कार करूनच आत मध्ये प्रवेश द्यावे असे सांगितल्याचे गोविंद शेंडे म्हणाले...  मुस्लिम तरुण त्या ठिकाणी आले, तर निश्चितच प्रत्येक मंडळांने त्यांना प्रवेश नाकारावं... जे हिंदू सणांमध्ये अडथळे आणतात, ज्यांची हिंदू सणांमध्ये धर्मामध्ये श्रद्धा नाही, त्यांनी आमच्या गरबा उत्सवात प्रवेश का करावं.. त्यांनी लव जिहाद करण्यासाठी प्रवेश करावा का?? त्यांना प्रवेश बंदी केलीच पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे शेंडे म्हणाले...  बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहे.. हिंदूंचे बळी गेले आहे... त्या लोकांना अशा उत्सवामध्ये श्रद्धांजली दिलीच पाहिजे अशी अपेक्षाही विश्व हिंदू परिषदेने नवरात्र उत्सव मंडळाने कडून व्यक्त केली आहे... यात कुठेही राजकारण नाही बांगलादेशमध्ये तर नवरात्र उत्सवावर बंदी आणण्याची प्रयत्न सुरू आहे.. त्याचा निषेध करणं राजकारण कसं होऊ शकते या संदर्भात आम्हाला बोलावेच लागणार आहे आणि त्यामुळे गरबा उत्सव मंडळात बांगलादेशमध्ये जे बळी गेले आहे, त्यांना श्रद्धांजली दिलीच पाहिजे असेही विश्व हिंदू परिषदेने बजावले आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram