Rajnath Singh on Modi : खरगेंना सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभो; तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील

Continues below advertisement

Rajnath Singh on Modi :  खरगेंना सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभो; तोपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोचरी टीका केली आहे. मोदींना पराभूत केल्याशिवाय मरणार नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. त्यावर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. आपण देवाकडे प्रार्थना करतो की खरगेंना सव्वाशे वर्ष आयुष्य मिळावं आणि तेवढीच सव्वाशे वर्षे मोदी पंतप्रधान राहतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.

हेही वाचा : 

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं.  सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो.  रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्रं आवश्यक आहेत म्हणून त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड बँक पासबुक जमा केले. मात्र अर्ज भरताना  लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड करुन त्याने त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले आणि अर्ज भरले. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित पुरुषांकडून त्यानं पैसे उकळले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित केंद्रचालक सचिन थोरात फरार झाला आहे. तर, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईपर्यंत संबंधित बँक अकाऊंट सील करणार असल्याचं म्हटलं.  अदिती तटकरे काय म्हणाल्या? महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून झालं आहे. जी  30-35 अकाऊंट्स आहेत त्यांच्या बँकांशी संपर्क साधून हे अकाऊंट फ्रीज करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी म्हटलं. या अकाऊंट्समधे भविष्यात कुठल्याही प्रकारचे ट्रॅन्झॅक्शन होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल. संबंधित आरोपी व्यक्तीचाही शोध सुरू आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.   अदिती तटकरे पुढं म्हणाल्या, जर चौकशीत जे नागरिक आहेत त्यांची अकाऊंट सील करण्यात आली होती ती पुन्हा चालू करु शकतो.जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीत जे या प्रकरणी दोषी नसतील त्यांची खाती पुन्हा चालू केली जातील. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांची खाती सील ठेवणं आवश्यक आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. जे निर्दोष असतील त्यांचे अकाऊंट लगेचच सुरु केली जाऊ शकतात.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram