Sharad Pawar Full Speech Jalgaon : मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही - शरद पवार
Sharad Pawar Full Speech Jalgaon : मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही - शरद पवार दिल्ली आसो पंजाब असो अनेक नेते एकत्र केले आणि काम करत आहोत ही एकी का करावी लागली,शेतीशी घटक आहेत,शेती मंत्री झालो एक महिन्याचे धान्य शिलक होते मी अस्वस्थ झालो आमच्या लोकांना खायला नाही शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे मागील काळात आपण शेती साठी दिंडी काढली होती त्याला प्रतिसाद मिळाला होता देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो मी अस्वःत झालो मागील काळात ६१ हजार कोटींचे कर्ज माफ केले आज देशाचे चित्र बदलेल आहे जो देश धान्य आयात करत होता आता तोच देश आता निर्यात करत आहे हे शेतकऱ्यांनी केले आहे जगभर साखर पुरवत आहे आज मोदी यांचे राज्य आहे बळीराजाला मदत होईल असे काही नाही, जवाहरलाल नेहरू यांच्या वर टीका केली जात आहे ,ज्यांनी देश साठी खस्ता खायल्या ,टीका करणे हे काय पंत प्रधान यांचे काम आहे आपण देशाचे पंत प्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे ते भाजप चे पंतप्रधान असल्या सारखे वागत आहेत भाव वाढल्याने सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले,आणि ते विचारता तुम्ही काय केले आज देशात वेगळा विचार करण्याची गरज आहेत कधी राहुल गांधी वर टीका करतात त्यांनी देशाच्या सगळ भागात जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेतले त्यांच्यावर टिंगल केली जात आहे बाळा साहेब गेल्या नंतर पक्षाची जबाबदारी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत अगोदर तुम्ही काय केले ते सांगा मग इतरांच्या वर टीका करा, काँग्रेसचा विचार ग्रामीण भागात फैजपूर अधिवेशन पासून दिला गेला अनेक नेते होऊन गेले त्यांनी राज्याचा आणि देशाचा विचार केला आता मोदींचे काळात काय आहे, अनेक लोकांना नोकरी नाही