Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ? अजित पवार... मोकळे ढाकळे... मनात जे आलं ते बोलणारे... एक घाव, दोन तुकडे... ना इकडे, ना तिकडे... मुद्द्यावर बोट आणि जाग्यावर पलटी... अशाच या दादांनी औपचारिक गप्पांसाठी पत्रकारांना बोलावणं धाडलं... आणि त्यात अशा काही ब्रेकिंग न्यूज दिल्या की, विधानसभेच्या पटावर दादा नेमके कसे चालणार... कोणतं प्यादं कसं सरकवणार... याचा अंदाज आलाय... लोकसभा निवडणुकीत जागा सोडताना किंवा मित्रपक्षांचे उमेदवार ठरवताना भाजपने सर्व्हेचे कागद पुढे सरकवले आणि त्यामुळे नुकसान झाल्याचं महायुतीतीलच नेते नंतर उघडपणे बोलले होते... आणि विधानसभेला तसाच फटका बसू नये यासाठी दादा सावध झाले असावेत... आणि म्हणूनच, भाजपसारखाच सर्व्हेचा अजेंडा राबवण्याचं दादांनी ठरवल्याचं बोललं जातंय... पण, सर्व्हेचा मास्टर असलेला भाजप दादांच्या सर्व्हेला किती महत्त्व देणार हे पाहायला हवं... सोबतच, ज्यांना भाजपने कडाडून विरोध केला त्या नवाब मलिकांना पुन्हा मैदानात उतरवण्याचा दादांचा मनसुबा समोर आलाय... त्याला भाजप मम म्हणणार का? हा खरा प्रश्नय..दादांसोबत गेलेल आमदार परत येणार असा दावा गेल्या काही दिवसांत खुद्द शरद पवारांसह त्यांचे नेतेही करतायत, त्याचाच धागा पकडून अजित पवारांनी त्यांचा रोडमॅपही गप्पांमध्ये उघड केलाय... माझ्यासोबतचे आमदार परत गेले तरी हरकत नाही, नव्यांना उभं करू आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत, कुणी गेलं तरी हरकत नाही अनेकांना संधी दिली, ते सगळे चांगल्या पदावर काम करतायत खरंतर, अजितदादांचा बंडाचा निर्णय हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासूनच सर्वात मोठा धक्का होताच... पण दादांच्या आयुष्यालाही मोठी कलाटणी देणारा होता... जो दादांना कौटुंबिक हिंदोळ्यावर नेणारा होताच, पण दादांच्या राजकीय कारकीर्दीतलाही तो सर्वात मोठा वळसा होता... जो दादांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारा होता... आणि त्याची पहिली लिटमस टेस्ट झाली ती लोकसभा निवडणुकीत... तिथं असमाधानकारक असा शिक्का बसल्यानंतर दादांसोबत गेलेले आमदार परत फिरणार का? अशा चर्चा रंगल्या... खुद्द शरद पवारांनीही तसे सूतावाच वेळोवेळी केले... त्यामुळे अनौपचारिक गप्पांमध्ये दादांनी सोबतच्या आमदारांबाबत दादांनी प्लॅन बी तयार ठेवल्याचं राजकीय जाणकार सांगतात