Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

Continues below advertisement

Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Probationers Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची चर्चा सुरू आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.   पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे. तीन ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. तसेच, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.  खेडकर कुटुंबीयांशी संपर्क होईना  खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. पौड पोलिसांचं एक पथक खेडकर यांच्या घरी आज येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.   मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलीस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टल ने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram