Barsu Refinery: बारसूवरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद?
abp majha web team
Updated at:
28 Apr 2023 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरी प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण बारसूवरून शरद पवारांनी दिलेल्या सल्ल्यावर संजय राऊतांनी उघडपणे टीकात्मक टिप्पणी केली.. पवार म्हणतात स्थानिकांना विश्वासात घ्या, पण म्हणजे नक्की काय करायचं, असा सवाल राऊतांनी केला.. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून पवारांच्या भूमिकेवर राऊतांनी थेट सवाल उपस्थित करणं पहिल्यांदाच घडलं असावं. त्यामुळे बारसू प्रकल्पावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.