एक्स्प्लोर

Sanjay Raut : Devendra Fadnavis यांना हटवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून अघोरी पूजा

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हाती घ्यावीत, ही राज्यातील जनतेची आणि लोकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या इच्छेचा स्वीकार केला आहे. याबाबत उद्धव ठाकरे आज वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलतील, असे संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी मनसेशी (MNS) युती करण्यासाठी ठाकरे गट कोणताही त्याग करायला तयार असल्याचे सूचित केले. 

आज संध्याकाळच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्याबाबत बोलतील ही अपेक्षा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना आजपर्यंत कोणापुढे झुकली नाही. ही डरपोकांची संघटना नाही तर मर्दांचा महासागर आहे. काही लोक आमच्या पाठीवर वार करुन निघून गेले. पण आम्ही एकटे असलो तरी लढत राहू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी बॅनरवर संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरावा: संजय राऊत

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. काही हौशे-नवशे देखील त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांनी वर्धापन दिनाचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा काय संबंध आहे. त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

Shivsena Vardhapan din: मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे

आज मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल घेण्यात आली माजी नगरसेवकांची बैठक. सहा महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ३ डिसेंबरला घेतलेल्या बैठकीत ६४ माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, मागील सहा महिन्यात ९ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 55 माजी नगरसेवक आहेत. 

शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकाधिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोलसाठी रणनीती  ठरवण्यासाठी  बैठका घेणे सुरू आहे. आजच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये सुद्धा माजी नगरसेवकांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असेल. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 July 2026: आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget