एक्स्प्लोर
Sangli Kidnapping Attempt | सांगलीत तीन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा डाव फसला
सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसानी हाणून पाडलाय. रात्री 11 च्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी सातारा मध्ये मुलाना घेऊन जाणाऱ्या संशयितास रेल्वे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं. अपहरण करण्यात आलेली मुले ही सांगलीच्या हनुमान नगर परिसरातील होती, कालपासून ही मुले गायब होती, सध्या ही तीनही मुले सुखरुप आहेत. मुलाना फूस लावून त्याचे अपहरण करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे विश्रामबाग पोलीस अधिक चौकशी करत असून यातून मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा





















