एक्स्प्लोर

Sangli Bhilavdi : कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : CM Uddhav Thackeray ABP Majha

#ABPMajha #CMUddhavThackeray #Sangli

सांगली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अवघ्या 5 ते 7 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आटोपला. अनेकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनंही दिली. 

भिलवडी येथे नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन सांगितलं की, सरकार सर्वोतोपरी मदत करेल, पण वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच त्या निर्णयांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जर पुनर्वसन करायचं असेल तर काही जणांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. दरवर्षी पूर येतो, दरवर्षी नुकसान होतं. चार महिने विस्थापितांचं जगणं जगावं लागतं. हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल, तर पुनर्वसनाचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, "अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनानं काम सुरु केले. सांगलीच्या या भागांत 4 लाख लोकांचं स्थलांतर केलं. प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला आहे. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळीये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच." पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आपल्याला नम्र विनंती आहे की, किती नुकसान झाले आहे, त्याचे सगळी आकडेवारी मिळत आहे. शेती, घरदार एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणं सुरु आहे."

"काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील, आपली त्याला तयारी हवी कारण दरवर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की, परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणार, असं काही झालं की, लगेच पॅकेज जाहीर केलं जातं. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू.", असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Food Poisoning : दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
Maharashtra Live News Updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; चौघांना अटक
Maharashtra Live News Updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; चौघांना अटक

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Embed widget