एक्स्प्लोर

Sandeep Deshpande On Amol Mitkari : आपली लायकी काय? आपण बोलतो काय? संदिप देशपांडेची मिटकरींवर टीका

Akola Amol Mitkari vs MNS : अकोला:  : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) नाव घेण्यात आलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील (Akola News)  सिव्हील लाईन पोलिसांत घडलेल्या घटनेबाबत जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचे या दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

तसेच, माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे  राज ठाकरेच असल्याचा  खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय पोलीसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसेसैनिक फरार राहू शकत नाही, असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले. परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.  

13 कार्यकर्त्यांवर गुन्हे, तिघांना अटक 

दरम्यान, अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिसरा आरोपीलाही  आता ताब्यात घेण्यात आले आहे. दिपक बोडखे याला अकोटमधून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. बोडखे पोलिसांच्या ताब्यात असलेला आतापर्यंतचा तिसरा आरोपी. याआधी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना केली अटक केलीय. सध्या दोघे प्रकृतीच्या कारणावरून अकोला जिल्हा रूग्णालयात भरती आहे. तर उर्वरित फरार असलेल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये मनसे (MNS) सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मिटकरी यांनी राज ठाकरेंचं नाव घेतल्याने आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतंय.

राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर जीवघेणा हल्ला

अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि प्रदेश सरचिटणीस कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्याचं समर्थन करत, त्या मनसैनिकांचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, अमोल मिटकरी यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या घातला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं मिटकरी यांनी म्हटलं.

मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार

दरम्यान, कालच्या अकोल्यातील मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर हृदयविकाराने मरण पावलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार  असल्याची माहिती पुढे आली आहे. जय याच्या निंबी मालोकार या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. जयच्या अंत्यसंस्कारासाठी प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकर आणि प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार उपस्थित राहणार आहेत. अकोल्यातील कार्यकर्त्यांशी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे. पुढच्या काही दिवसांत अमित ठाकरे मालोकार कुटुंबियांच्या भेटीसाठी अकोल्यात येण्याचीही शक्यता आहे. सध्या जयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा रूग्णालयात आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Mumbai Crime News: छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ED ची कारवाई; मुंबईच्या डोंगरीतील लांबत इमारतसह एकूण चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ED ची कारवाई; मुंबईच्या डोंगरीतील लांबत इमारतसह एकूण चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Donald Trump : मध्यावधी निवडणुकीत पराभव होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात भाकरी फिरवली, विश्वासू व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपवली
मध्यावधी निवडणुकीत पराभव होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात भाकरी फिरवली, विश्वासू व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपवली
Diwali 2026: 8 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; दिवसभरातील पूजा, धार्मिक महत्व...
8 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; दिवसभरातील पूजा, धार्मिक महत्व...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Embed widget