NCB on Sameer Wankhede : वानखेडे खोटे पुरावे देऊन तपासाला चुकीची दिशा देत आहेत
एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंचा पाय रोजच्या रोज खोलात जातोय. वानखेडे यांची आज दुसऱ्या दिवशीही सीबीआयने पाच तास चौकशी केली. आजच्या चौकशीत वेगवेगळी माहिती पुढे आलीय. वानखेडेंनी शाहरुख खानसोबत केलेल्या चॅटची वरिष्ठांना कधीही माहिती दिली नव्हती, असा दावा एनसीबीने केलाय. हे चॅट वानखेडेंनी न्यायालयात सादर केल्यावर समजलं. तसेच समीर वानखडे यांनी खासगी व्यक्ती के. पी. गोसावी यांच्या संदर्भात उत्तर दिलेलं नाही, याकडेही एनसीबीने लक्ष वेधलंय. गोसावीवर गुन्हे दाखल असूनही त्याला तपासात सहभागी केल्याच्या आरोपांवरही वानखेडेंनी उत्तर दिलं नाही, असा दावा एनसीबीने केलाय. तसेच खोटे पुरावे सादर करून वानखेडे तपासाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप एनसीबीने केलाय.





















