Punjab : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी
पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. पंजाबच्या चन्नी सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केलेत. तसेच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हालचालींचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिलेत. सीमेवरील दहशतवादाचा हा मुद्दा आणि एनआयएचे अधिकारी या प्रकरणी तपासात सहकार्य करू शकतील, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीवेळी सांगितलंय. दरम्यान ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचा एक व्हीडिओ संयुक्त किसान मोर्चाने जारी केलाय. पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ पोहोचणारे भाजपचे कार्यकर्ते होते असा दावा या व्हीडिओमधून करण्यात आलाय.



















