Pune Rain 25 July : पुण्यामध्ये 25 जुलैलाचा 26 जुलै, पुणेकरांचे हाल
Pune Rain 25 July : पुण्यामध्ये 25 जुलैलाचा 26 जुलै, पुणेकरांचे हाल
पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट इतकी आहे. खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अचानक परिसरात पाण्याची वाढ झाल्याने महिला, रुग्ण आणि नवजात बालकांचे हाल झाले आहेत. काहींनी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांवरच टीका केली आहे.



















