Pune : पुण्यात पोलिसांवर जमावाचा हल्ला,स्थानिक गुडांनी नागरिकांना भडकवलं : ABP Majha
पुण्याच्या येरवडा भागात एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला... काल रात्री साडे साडेनऊ वाजता येरवडा भागातील कोतेवस्ती मध्ये ही घटना घडली... या भागातील स्थानिक रहिवाशांना तेथील शक्ती सिंह नावाचा सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. आलेल्या तक्रारीनुसार येरवडा पोलिसांचे एक पथक रात्री कारवाईसाठी गेलं असताना शक्तीसिहंनं.. काही नागरिकांना पोलिसांविरुद्ध भडकावले.त्यानंतर नागरिकांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणार्थ हवेत गोळीबार केला... त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि त्यानंतर पोलिसांनी शक्ती सिंह यास अटक केली... या घटनेत काही पोलिस कर्मचारी जखमी देखिल झाले आहेत

















