Pune Crime : पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, मुंढवा भागात दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत (PUNE CRIME) आहे. त्यात रोज नव्या घटना समोर येत आहे. कधी कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे. तर कधी थेट रस्त्यांवर हत्या केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरु आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील मुंढवा भागात आरोपींनी धुडगूस घातला आहे. दारूच्या नशेत आरोपींकडून 8 गाड्यांची तोडफोड केली आहे.
हा सगळा प्रकार समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. त्यांनी आरोपीला शोधलं आणि त्याला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून येरवडा आणि मुंढवा परिसरात अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच परिसरात दहशत माजवल्याचं समोर आलं आहे. या भुरट्यांकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहे. त्यासोबतच गाड्यांचं नुकसान झालं आहे.