Pooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPooja Khedkar Update : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
ही बातमी पण वाचा
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
IAS Probationers Pooja Khedkar: पुणे : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी ट्रेनी असतानाही आयएएस यांनी जिल्हाधिकारी असल्याप्रमाणे केलेला रुबाब, त्यांच्या खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर (Puja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांनी मागवला आहे.
ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी मागवला आहे. खाजगी गाडीवर अंबर दिव्याच्या वापर करणं, तसेच पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावणं यांसह पुजा खेडकर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कुठल्या कुठल्या कार्यालयात गेल्या होत्या, याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत.