पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्गातील रुग्णांची आकडेवारी घटली,6 जिल्ह्यांना दिलासा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2021 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 9,798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 56,99,983 इतकी झालीय. आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.