Parbhani : एका तासाची मेहनत, ट्रॅक्टरचा आधार; चिखलात रुतलेली एसटी बाहेर काढली
Parbhani : एका तासाची मेहनत, ट्रॅक्टरचा आधार; चिखलात रुतलेली एसटी बाहेर काढली
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागांच्या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे सर्वसामान्य गावकरी महिला शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी ना या रस्त्यांचा जसा फटका बसतोय तसाच आता एसटी बसला ही या रस्त्यांचा फटका बसलाय परभणीच्या पाथरी तालुक्यातील गोंडगाव येथे मानव विकास ची बस सकाळी विद्यार्थिनींना घेण्यासाठी आली असता रस्त्याच्या चिखलात ही बस फसली जवळपास एक तास गावकऱ्यांनी ही बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र गुडघ्या एवढ्या चिखलात ही बस फसल्याने यश मिळाले नाही शेवटी ट्रॅक्टर लावून ही बस बाहेर काढावी लागलीय.त्यामुळं ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सुधारणार केव्हा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय






















