एक्स्प्लोर
Parbhani Rain | परभणीत नेमका किती पाऊस? आकड्यात तफावत, सत्य शोधण्यासाठी समिती गठित
परभणी जिल्ह्यात पडलेला पाऊस मोजण्यासाठी शासकीय आणि विविध पातळीवर खाजगी संस्थांची व्यवस्था असते. याच पावसाच्या आकडेवारीवर पेरणी आणि पुढे दुष्काळ, पीक विमा याबाबतचे शासकीय धोरण ठरत असते. परंतु परभणीत याच पावसाच्या मोजलेल्या आकडेवारी बाबत मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. कारण परभणीत एका रात्रीतील 4 तासात तब्बल 186.2 मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्याने केला आहे. ज्याची नोंद देखील आहे. मात्र याच दिवशी याच वेळी 85 मिमी पावसाची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याहून अधिक म्हणजे कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने तर 58.8 मिमी ची नोंद केली आहे. त्यामुळे नेमके खरे आकडे कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळं खरच हा पाऊस एवढा पडलाय का? याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती नेमली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
आणखी पाहा



















