Maharashtra Paper leak : पेपरफुटीचा पर्दाफाश, कुठे काय काय मिळालं?
पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी आज अजून दोघाना अटक केलीय. 2018 लाझालेल्या टी ई टी परिक्षेत देखील गैरव्यवहार झाला होता.त्यावेळेस अश्विन कुमार जी ए टेक्नॉलॉजीजचा मॅनेजर होता.ही टोळी मार्कशीटमध्ये फेरफार करायची. पैसै दिलेल्या उमेदवाराला उत्तरपत्रिका कोरी ठेवायला सांगायचे. 2018 च्या परिक्षेत या टोळीने पाचशे मार्कशीटमधे फेरफार केल्याचे उघड झालेय.यातून या टोळीने पाच कोटी कमावलेत.सुखदेव डेरे हा त्यावेळेस आयुक्त होते.सुखदेव डेरे हे 2018 साली झालेल्या गैरव्यवहारात आयुक्त म्हणून सहभागी होते.सानप हा दलाला म्हणून काम करत होता. आरोग्य विभागातील भरतीत त्याचा सहभाग दिसून आलाय.आतापर्यत 500 जणांकडे 5 कोटीच्या बर रक्कम असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.अजूनही यामध्ये अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आतापर्यत पोलिसांनी पेपरफुटी अन घोटाळा प्रकरणी 23 जणांना अटक केलीय.अजूनही या प्रकरणाची व्यप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.