Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेर
विठ्ठल मंदिराच्या दुरुस्तीसाठी काचेच्या पेटिट असणारा विठुराया आता मुक्त होणार असून २ जून पासून लाखो विठ्ठल भक्तांना पुन्हा देवाच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेता येणार आहे . आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची माहिती दिली . विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे रूप देण्याचा ७३ कोटींचा विकास आराखडा चे काम वेगाने सुरु आहे . यातच विठ्ठल रुक्मिणीचे गर्भगृह , चौखांबी , सोळखांबी वगैरेभागातील काम पूर्णत्वाकडे जात असल्याने सध्या सुरु असलेले मुखदर्शन बंद करून भाविकांना आता थेट पायावर दर्शन घेता येणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले . १५ मार्च पासून देवाचे पायावरच दर्शन बंद करून केवळ सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत केवळ ४ तास भाविकांना देवाचे दर्शन घेता येत होते . समितीच्या या निर्णयामुळे गेले अनेक दिवसापासून देवाच्या चरण स्पर्शासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांना २ जून पासून ते घेता येणार आहे .