Neet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?

Continues below advertisement

Neet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ? नीट घोटाळ्यातील शिक्षक जाधव याची याच माढा तालुक्यातील टाकळी क्या जिल्हा परिषद शाळेवर नेमणूक होती पण तो नेहमीच गैरहजर राहत होता .. त्यांचेवर कडकं कारवाईची मागणी ग्रामस्थ करीत आहेत ..  नीट परीक्षा घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केलेला  संजय तुकाराम जाधव हा  शिक्षक  माढा तालुक्यीतील टाकळी गावच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत  उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे  *-शाळा सुरु झाल्यापासून तो शाळेकडे  फिरकलेला देखील नसून शिक्षण विभाग अशा शिक्षकांकडे लक्ष देत नसल्याने असले उद्योग करण्यास त्यांना वेळ मिळतो अशी टीका ग्रामस्थ करू लागले आहेत .   टाकळी च्या शाळेवर पोटशिक्षकाची नियुक्ती करुन संजय जाधव लातूर मध्ये असायचा अशी माहिती समोर आली असून शिक्षक जाधव व शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी दादा कळसाईत यांनी केली आहे .  उपशिक्षकाचे नाव नीट परिक्षा कनेक्शन मध्ये आल्याने सोलापूर जिल्हाच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram