Maharashtra Omicron : मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढली, मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण : ABP Majha
ओमायक्रॉन व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली असताना राज्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत. काल दिवसभरात राज्यात ३१ नवे रुग्ण आढळलेत. यापैकी मुंबईत सर्वाधिक २७ नव्या रुग्णांची नोंद झालीय. ओमायक्रॉनचे टेन्शन वाढत असताना कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होतेय. काल दिवसभरात राज्यात १ हजार ६४८ नव्या रुग्णांची नोंद झाली.. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या २०० वरुन थेट ९००च्या घरात गेलीय. तिकडे हिवाळी अधिवेशनातही कोरोनाचा शिरकाव झाला. अधिवेशनात आतापर्यंत ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचे नियम पाळा, मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन आम्ही करतोय






















