Mumbai : बुलेट ट्रेनसाठी गेलेल्या जमीनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशावर कर नाही, कोर्टाचा निकाल
Continues below advertisement
बुलेट ट्रेनसाठी आपल्या जमिनी देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बुलेट ट्रेनसाठी गेलेल्या जमीनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशावर कर लागणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सीमा पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही महत्वपूर्ण सुनावणी झाली. NHSRCL या कंपनीकडून भिवंडीतल्या त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशावर कर लावून ही रक्कम त्यांना मिळाली होती. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
Continues below advertisement