NItesh Rane : शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंची कोर्टात धाव, उद्या
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटलाय. कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता वर्तवली, तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होतोय. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राणेेंनी केला. तर राणेंच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी या हल्ला प्रकरणातल्या सूत्रधारावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात मोर्चा काढायचं ठरवल्यानं शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.....



















