Chandrapur Bike Theft : चंद्रपुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवतीला अटक, 2 मित्रांसह चोरल्या 11 दुचाकी
राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपुर शहर युवती प्रमुख असलेल्या एका तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. वैष्णवी देवतळे असं या अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. वैष्णवीसह मनीष पाल आणि सौरभ चंदनखेडे या तिच्या मित्रानांही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या तिघांनी 11 दुचाकी चोरल्याचं समोर आलंय. लॉक नसलेल्या दुचाकीवर ही टोळी लक्ष ठेवायची. संधी साधून वैष्णवी त्या गाडीवर बसायची आणि तिचा साथीदार गाडीतील पेट्रोल संपलं आहे असं भासवून दुसऱ्या वाहनाने टो करायचा. नंतर निर्जनस्थळी मेकॅनिक साथीदाराच्या सहाय्याने गाडी सुरू करून पळ काढायचे. विशेष म्हणजे आरोपी वैष्णवी ही पॉलिटेकनिकच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.



















