Narendra Modi on Elections : भाजपची देशात लाट आहे, पाचही राज्यांमध्ये भाजपचाच विजय होणार
नवी दिल्ली: काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष असून त्यामुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक विशेष मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधानांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे सात मुद्दे
सर्व राज्यात भाजप निवडूण येणार
पाच राज्यांमध्ये भाजपचाच विजय होणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला पाच राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल. निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. सर्व राज्यात मला भाजपाची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकेल असं ते म्हणाले.





















