एक्स्प्लोर

Narayan Rane PC : मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं राष्ट्रद्रोह : नारायण राणे ABP Majha

नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा शिगेला पोहोचलेला असताना मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज संभाव्य अटकेबाबात नारायण राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. 

नारायण राणे बोलताना म्हणाले की, "माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा आणि मग आपापल्या टिव्हीवर दाखवा. नाहीतर माझी केस दाखल होईल तुमच्याविरोधात. गुन्हा नसताना पथक निघालाय, अटक होणार असं दाखवलं जात आहे. काय नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? उगाच कोणाचंही नाव सांगता, शिवसेना... कोण शिवसेना? एखाद्याचं नाव सांगा, नेत्याचं नाव सांगा. कोण बडगुजर मी ओळखत नाही. माध्यमांनी जर माझी बदनामी करायला घेतली, तर माझ्याकडून माध्यमांवर गुन्हा दाखल केला जाईल. मी माध्यमांच्या बातम्यांवर, सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. दो दगड मारून गेले, पुरुषार्थ नाही. जे काही करायचंय ते करु देत, आम्ही पाहू त्याला."

"जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही? त्याचं माध्यमांनीही का नाही दिवस-रात्र दाखवलं? 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन मुख्यमंत्री असतानाही त्यांना माहीत नाही, त्यावेळी मी असतो तर... असं म्हणालो होतो. असतो तर... हा क्राईम होत नाही. मी जर आता कानफाडात फोडीन असं म्हणालो असतो, तर हा क्राईम झाला असता. जरा समजून घ्या.", असं म्हणत नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिलं. 

"मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते… समोर उभं तरी राहावं. पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की, पंतप्रधान आहे? मी जे बोललो तो गुन्हा नाही. तपासून पाहावं.", असं नारायण राणे म्हणाले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget