Raj Thackeray यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर मुस्लिम मनसैनिक नाराज, राजीनामा सत्र सुरू
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर मुस्लिम मनसैनिक नाराज झालेत. मशिदीवर भोंगे लावले तर समोर हनुमान चालिसा लावा असं आवाहन राज यांनी केलं आणि काही मनसैनिकांनी त्याची अंमलबजावणीही सुरु केली. राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या या वक्तव्यानंतर पुणे आणि कल्याणमधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. पुण्यात शाखा अध्यक्ष असलेल्या माजिद अमीन शेख यांनी राजीनामा दिलाय. तर अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही आपली नाराजी सोशल मीडियातून व्यक्त केलीय. त्यांची भावनिक पोस्ट व्हायरल झालीय. मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढचा निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
















