Yavatmal : खासदार बाळू धानोरकरांकडून कोरोना निमयांचं उल्लंघन, कबड्डी पाहण्यासाठी विनामास्क
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे नियमांचं पालन करा, असं आवाहन सर्वसामान्यांना करण्यात येतंय. मात्र, नेते मंडळीच या नियमांचं सर्रास उल्लंघन करत असल्याचं पाहायला मिळतंय. यवतमाळमध्ये खासदार बाळू धानोरकरांनीही कोरोना निमयांचं उल्लंघन केलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील मार्डीमध्ये कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामान्यांच्या ठिकाणी खासदार बाळू धानोरकरांनी उपस्थिती लावली होती. या सामन्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली. यावेळी लोकांना गर्दी कमी करण्याचा सल्ला देण्याऐवजी धानोरकर स्वत: कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. दरम्यान या गर्दीमध्ये खासदार धानोरकरांसह अनेजण विनामास्क असल्याचं पाहायला मिळालं..
महत्त्वाच्या बातम्या



















