Monsoon Update : मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार, यंदा मान्सूनचं आगमन उशिराने : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 May 2023 09:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात यंदा मान्सून तीन दिवस उशिरानं दाखल होणार आहे. मान्सूनचं आगमन चार जून रोजी होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.सर्वसाधारणपणे नैऋत्य मान्सून हा एक जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. पण यंदा मान्सून तीन दिवस उशिरानं केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खाजगी एजन्सीनंही अंदमानमध्ये मान्सून उशिरानं दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून साधारण २२ मे रोजी अंदमानमध्ये दाखल होत असतो. पण यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसतेय...महाराष्ट्रात ९ जून आणि मुंबई १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार आहे..त्यामुळं तो विलंबाने दाखल होईल असा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.