Raj Thackeray Birthday: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 53वा वाढदिवस; खास व्हिडीओद्वारे पक्षाकडून शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2021 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (14 जून) 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.