Zero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP Majha
नुकतीच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही तुम्हाला आधीही सांगितले आहे. मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जी लाडली बहना योजना आणली.... त्याचा थेट परिणाम तिथे भाजपला प्रचंड बहुमत मिळण्यात झाला असे मानल्या जाते ... अवघ्या ४ महिन्यावर आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हाच फायदा होण्यासाठी म्हणून आता महाराष्ट्र सरकारने हीच योजना राज्यात घोषित केल्याचे मानल्या जाते ...
सत्तेची किल्ली म्हणून जर एखाद्या योजनेकडे बघितल्या जात असेल तर मग राजकारण दूर असू शकत नाही. सत्ताधारी त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करत असतानाच, विरोधक मात्र तो त्यांना कसा मिळू नये ह्यासाठी तत्परता दाखवणारच. आणि तेच आज विधी मंडळात बघायला मिळाले. , आज विरोधकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्ज पत्रिकांवरुन आरोप केलेत.. त्याचं झालं असं की, लाडकी बहीण अर्जावर पाच नेत्यांचे फोटो आहेत.. अर्जाच्या वरच्या भागात दोन कोपर्यात दोन फोटो आहेत .... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
तर अर्जपत्रिकेच्या खालच्या भागात आहेत अजून तीन फोटो - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे.
बस, नेमके हेच पाच फोटो विरोधकांना खटकले.. आणि आरोप सुरु झाले.