![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. ऋषिकेश जोंधळे यांच्यावर त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेश जोंधळे यांना त्यांचे चुलत बंधू दीपक जोंधळे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमगण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत 20 आणि 28 वर्षांचे हे सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
![Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/bb45133d712dde88ff30b5675d1161f0171994477866590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)