Manoj Jarange : 'सगेसोयरे'वर अंमलबजावणी केली नाही तर माघार घेणार नाही : जरांगे
Manoj Jarange : 'सगेसोयरे'वर अंमलबजावणी केली नाही तर माघार घेणार नाही : जरांगे
Manoj Jarange Patil PC : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आरक्षण टिकावं म्हणून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे.
जरांगे सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर ठाम
जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आम्ही सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.




















