Mahendra Thorve on Dada Bhuse :मी तुमच्या घरचं खात नाही,दादाभुसे यांच्यावर महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
Mahendra Thorve on Dada Bhuse :मी तुमच्या घरचं खात नाही,दादाभुसे यांच्यावर महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता विधानसभेमध्ये सुद्धा राडा झाला आहे. विधिमंडळाचे लाॅबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडल्याने एकच खळबळ उडाली. मंत्री दादा भुसे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. यामुळे आता विधानसभेमध्ये सुद्धा पोलीस लावण्याची वेळ आल्याची खोचक प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर हा वाद गेल्यानंतर त्यांनी महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना एकत्र घेऊन कार्यालयामध्ये गेले.