Maharashtra Corona : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कोण लपवतंय? ABP Majha
कोरोनाकाळात आकडेवारी लपवली जात असल्याचे आरोप अनेकदा झाले होते. आता पुन्हा एकदा अशाच आरोपांची चर्चा सुरू झालेय. कारण कोरोना मृत्यूसाठी सरकारकडून मिळणाऱ्या सानुग्रह मदतीसाठी अमरावती जिल्ह्यात दुप्पट अर्ज दाखल झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात सरकार दफ्तरी एकूण १६०० कोरोना मृत्यूंची नोंद आहे मात्र 50 हजारांच्या सानुग्रह मदतीसाठी एकूण ३ हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. अमरावती पालिका क्षेत्रात कोरोना ५६७ मृत्यूची नोंद असताना तब्बल २८०० अर्ज आले आहेत. तर ग्रामीण भागात ११०० मृत्यूची नोंद असताना तिथे मात्र अवघे २०० अर्ज आले आहेत. सरकारकडून आकडे लपवले जातायत, की मिळणाऱ्या अनुदानासाठी लोक खोटे अर्ज करतायत? हे तपासून पाहावं लागणार आहे.



















