Maharashtra Accident : राज्याच्या वेगवेगळ्या भागात अपघाताच्या घटना ABP Majha
राज्याच्या वेगवेगळ्या भागात अपघाताच्या घटना घडल्यात. हिंगोलीत पूर्णा नदीपात्रात बुडून बहीण भावाचा मृत्यू झालाय. काल हे दोघंही शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी पूर्णा नदीच्या काठी गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. तिकडे नांदेडच्या माहूर इथं देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकीला कारने चिरडलंय. श्री देवदेवेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली. यांत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीररीत्या जखमी झाली. इकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेववर बोरघाटात ट्रेलर आणि ट्रकचा अपघात झाला. ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. यांत ट्रेलरचालकाचा मृत्यू झाला. तर जळगावात दूध टँकर आणि ट्रकच्या अपघातात ५ जण दगावलेत. मुक्ताईनगर तालुक्यात घोडासगाव जवळ ही घटना घडलीय.




















