Mahada Exam : म्हाडा भरती परीक्षेचं वेळापत्रक ठरलं,म्हाडाची सरळ सेवा भरतीची परीक्षा होणार : ABP MAJHA
म्हाडा भरती परीक्षेचं वेळापत्रक ठरलं. 1 ते 15 फेब्रुवारीदरम्यान म्हाडाची सरळ सेवा भरतीची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचं समोर आलं. त्यामुळे म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अखेर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
